Type Here to Get Search Results !

बुद्ध आले जन्मास भजन लिरिक्स | Buddh Aale Janmaas Bhajan Lyrics

Buddh Aale Janmaas Bhajan Lyrics


बुद्ध आले जन्मास भजन लिरिक्स


वैशाखी पुनवेला घडला
ऐसा हा इतिहास
विश्वतारण्या महान मानव
बुद्ध आले जन्मास

प्रभात वेळी वनी लुंबिनी
महामाया क्षण भर थांबूणी
शांती सुखाचे या अवनिवर
जीवन ये उदियासे

शाल वृक्षाचा मोहर तो पडता
फांदीला त्या धरून ओढता
निसर्गाच्या हवेत भरला
धुंद नवा सुवास

प्रसूतीच्या होता वेदना,
आखली मनी सौख्य साधना
पुत्र जन्मता हा तिला
भासे जणू तिचे आकाश

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
close button